Skip to content
Get 25% Off INSANTLY — free hearing test at homeCheck Price

जुनी श्रवणयंत्रे दान करा – कोणाच्या तरी आयुष्यात पुन्हा ऐकण्याचा आनंद फुलवा!

तुमच्याकडे वापरात नसलेली BTE किंवा RIC श्रवणयंत्रे आहेत का? ती फेकून देण्याऐवजी VR Speech & Hearing Clinic ला दान करा. आम्ही कार्यरत व बंद पडलेली श्रवणयंत्रे, आणि RIC Receivers स्वीकारतो. तपासणी व आवश्यक दुरुस्तीनंतर ही श्रवणयंत्रे गरजू श्रवणबाधित व्यक्तींना उपलब्ध करून दिली जातात. तुमचे एक दान कोणाच्या तरी आयुष्यात पुन्हा संवाद, आत्मविश्वास आणि आनंद परत आणू शकते. आजच सहभागी व्हा आणि सामाजिक जबाबदारी पार पाडा.

I Want to Help

अनेक लोक नवीन श्रवणयंत्र घेतल्यानंतर त्यांची जुनी Hearing Aid घरीच पडून राहते. काही उपकरणे पूर्णपणे कार्यरत असतात, तर काही किरकोळ दुरुस्तीनंतर पुन्हा वापरता येऊ शकतात. अशी श्रवणयंत्रे एखाद्या गरजू व्यक्तीसाठी नवजीवनाची संधी ठरू शकतात.

VR Speech & Hearing Clinic मध्ये आम्ही वापरलेली BTE (Behind-the-Ear) आणि RIC (Receiver-in-Canal) प्रकारची श्रवणयंत्रे स्वीकारतो. तपासणी, आवश्यक असल्यास दुरुस्ती, प्रोग्रामिंग आणि स्वच्छता केल्यानंतर ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू श्रवणबाधित व्यक्तींना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

कोणती उपकरणे दान करू शकता?

  • Working किंवा Non-Working BTE Hearing Aids

  • Working किंवा Non-Working RIC Hearing Aids

  • Earmolds

  • RIC Receivers

  • Hearing Aid Accessories (उपलब्ध असल्यास)

कृपया Hearing Aid मधील Battery काढूनच पाठवा.

दान कसे कराल?

  1. Hearing Aid, Earmold आणि Accessories सुरक्षितपणे Zip Lock Bag मध्ये ठेवा.

  2. त्यावर Bubble Wrap लावून पॅक करा.

  3. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि संपर्क माहिती असलेले Visiting Card किंवा छोटे पत्र सोबत ठेवा.

  4. आमच्या क्लिनिकशी संपर्क साधून Donation नोंदणी करा.

  5. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये जमा करू शकता किंवा कुरिअरद्वारे पाठवू शकता.

दान केलेल्या श्रवणयंत्रांचे काय होते?

  • प्रत्येक Hearing Aid ची तांत्रिक तपासणी केली जाते.

  • आवश्यक असल्यास दुरुस्ती व प्रोग्रामिंग केली जाते.

  • पूर्ण स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते.

  • योग्य उमेदवारांची Audiological Evaluation करून त्यांना Hearing Aid फिट केली जाते.

  • वापर, देखभाल आणि Follow-up सेवा दिली जाते.

तुमच्या दानाचा परिणाम

तुमचे वापरात नसलेले Hearing Aid एखाद्या मुलाला शिक्षणात मदत करू शकते, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला कुटुंबाशी पुन्हा संवाद साधण्याची संधी देऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास परत मिळवून देऊ शकते.

प्रत्येक दान म्हणजे फक्त एक उपकरण नव्हे, तर आवाज, संवाद आणि आनंदाची नवी सुरुवात आहे.

आमच्याशी संपर्क साधा

व्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक

पत्ता:

दुसरा मजला, वसंतराव नाईक चौक, दीपाली एक्झिक्युटिव्ह हॉटेलसमोर, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – ४३१००३.

Send Us a Message

Tell us what you need and we'll get back to you.